एकांत...
एकांत वाईट असतो
एकांतात बागडणाऱ्याला एकटा म्हणतात
पण जे म्हणतात त्यांना माहीत नसतं
की एकांतात असताना किती आनंद असतो...
तसं पाहिलं तर
मी दुःखात नाही.
मी एकांतात पण नाही.
मी माहीत नाही कुठे आहे
पण नक्कीच दुःखात नाही.
वारा, पाऊसाला, थंडी, गर्मी ने नक्की भारावले तर आहे.
पण ह्याच्याच मुळे
नवीन रूप तर बघायला मिळाले आहे.
असंख्य लोक, असंख्य मित्र मैत्रिणी तर भेटले
पण असा कोणी नाही ज्याला खरं काही सांगू शकले.
सुखाच्या स्वरूपात आला
दुःखाच्या सानिध्यात आला
कुठला मित्र किव्हा मैत्रीण नाही
पण
एकांत नक्कीच मदतीला आला
ह्याचात परत आला तो साथीदार
ज्याला घाबरतात सगळे
घाबरायच काये त्यात
तो एकांत तर आहे...
Aparajitaaa_
Comments
Post a Comment